Indapur News: इंदापुरातील 96 सरपंचपदांची आरक्षण सोडत; नव्याने काढलेल्या सोडतीने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंचांत कभी खुशी कभी गमची स्थिती
Indapur News
इंदापुरातील 96 सरपंचपदांची आरक्षण सोडतPudhari
Published on
Updated on

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील 96 गावांची सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम शुक्रवारी (दि.11) पार पडला. सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी काढलेल्या सोडतीनंतर अनेक गावांतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. नव्याने आरक्षण जाहीर झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंचांत कभी खुशी कभी गमची स्थिती पहावयास मिळत आहे.

या वेळी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, निवासी नायब तहसीलदार स्वाती राऊत, अविनाश डोईफोडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, महसूल सहाय्यक दीपक पवार, राहुल पारेकर उपस्थित होते. इयत्ता दुसरीतील संस्कृती अजय गायकवाड आणि शिवांश विजय गायकवाड या सात वर्षीय चिमुकल्यांनी चिठ्ठ्या काढल्या. (Latest Pune News)

Indapur News
Junnar Elections: जुन्नरमधील 97 सरपंचपदांचे आरक्षण जाहीर

ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण 23 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते रद्द करून नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. 15 जुलैपर्यंत आरक्षण नव्याने निश्चित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी सरपंच पदाची आरक्षण सोडत पार पडली.

सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे - अनुसूचित जाती स्री - जाधववाडी, डाळज नं.3 करेवाडी, तरंगवाडी, लासुर्णे, वालचंदनगर, कचरवाडी (नि.के ), काटी. अनुसूचित जमाती स्त्री - तक्रारवाडी, अनुसूचित जाती - गलांडवाडी नंबर दोन, कचरवाडी (बावडा), बळपुडी, दगडवाडी, बावडा, अजोती, झगडेवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग - गलांडवाडी नं.1, जंक्शन, हिंगणगाव, माळवाडी, रेडा, शेळगाव, थोरातवाडी, निरवांगी, बेलवाडी, सराफवाडी, कळस, शिंदेवाडी, बिजवडी, डिकसळ. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - कडबनवाडी, जांब, रणमोडवाडी, चांडगाव, वरकुटे खुर्द, वरकुटे बुद्रुक, भादलवाडी, भावडी, घोरपडवाडी, लाकडी, अकोले, पिंपरी बुद्रुक, हगारवाडी.

सर्वसाधारण स्त्री - निमगाव केतकी, भिगवण, लोणी देवकर, पळसदेव, अंथुर्णे, आनंदनगर, सणसर, पोंदवडी, शेटफळगढे, तावशी, चिखली, निमसाखर, टणू, व्याहळी, कुरवली, कुंभारगाव, मानकरवाडी, चाकाटी, जाचकवस्ती, पिंपळे, शहा, पिंपरी खुर्द, सरडेवाडी, पडस्थळ, पीठेवाडी, गोतोंडी, म्हसोबाचीवाडी.

Indapur News
Ganesh Festival 2025: गणेशोत्सवाला नवी झळाळी!

सर्वसाधारण - निरगुडे, गिरवी, कळंब, नरसिंहपूर, डाळज नं.1, डाळज नंबर 2, कळाशी, गोंदी /ओझरे, भोडणी, बाभूळगाव, सपकळवाडी, रेडणी, भांडगाव, बोरी, सराटी, न्हावी, निंबोडी, लाखेवाडी, मदनवाडी, काझड, भरणेवाडी, कौठळी, गांजेवळण, वकीलवस्ती, रुई, पिटकेश्वर.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडून 20 गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. तिचे आरक्षण कायम राहिले आहे. ते पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती - कालठण नं.2, भाटनिमगाव. अनुसूचित जाती स्त्री - उद्धट, तरटगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग - गोखळी. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री - बोराटवाडी, अगोती नं.2, अवसरी. सर्वसाधारण स्री - खोरोची, पवारवाडी, शिरसटवाडी, कांदलगाव, निरनिमगाव, लुमेवाडी. सर्वसाधारण - कालठण नं.1, पंधारवाडी, अगोती नं.1, वडापुरी, शेटफळ हवेली, सुरवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news