माळेगाव : स्ट्रॉम वॉटर गटराची उंची वाढवा

माळेगाव : स्ट्रॉम वॉटर गटराची उंची वाढवा
Published on: 
Updated on: 

माळेगाव; पुढारी वृत्तसेवा : माळेगाव नगरपंचायत हद्दीत निरा-बारामती राज्यमार्गाच्या कडेला स्ट्रॉम वॉटर गटाराचे काम युध्द-पातळीवर सुरू आहे. मात्र, काम करत असताना संबंधित ठेकेदाराने गटाराची खोली न वाढवता हे काम रेटून नेले आहे. त्यामुळे गावातून वाहून येणारे पावसाचे पाणी रस्त्याच्या जवळील लोकवस्तीमध्ये शिरून मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी गटाराची खोली वाढवावी; अन्यथा काम बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोकराव सस्ते व ग्रामस्थांनी यांनी दिला आहे.

माळेगाव नगरपंचायत हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली निरा-बारामती राज्य मार्गाचे राजहंस चौक ते इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रुंदीकरणाचे काम केले जात आहे. त्यासोबतच दुर्तफा स्ट्रॉम वॉटर गटाराचे काम केले जात आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे रस्त्याची उंची वाढणार आहे.

त्यामुळे नगरपंचायतीच्या रस्त्याजवळ असणार्‍या व्यापारी बाजार गाळ्यात तसेच मुस्लिम गल्ली, वडारगल्ली व सावतानगर भागांत राहत असणार्‍या नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी स्ट्रॉम वॉटर गटाराची खोली वाढवावी व कामाचा दर्जा राखला जावा, याकरिता वारंवार संबंधित अधिकार्‍यांना विनंत्या, अर्ज करून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांना बरोबर घेऊन काम बंद आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा अशोकराव सस्ते यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news