दिलासादायक! खेड तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
दिलासादायक! खेड तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
दिलासादायक! खेड तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
Published on
Updated on

कडूस: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खेड तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

चासकमान धरणात बुधवारी (दि. २१) ६.२५ टक्के असणारा पाणी साठा गुरूवारी (दि. २२) सकाळी ७.३०% म्हणजेच १.५१ टीएमसी इतका झाला. मागील वर्षी याच तारखेला धरणात ७.१८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता, तर भामा आसखेड धरणात बुधवारी (दि. २१) १५.९ टक्के असणारा पाणी साठा गुरूवारी (दि. २२) सकाळी १५.५३ % म्हणजेच १.६३ टीएमसी झाला आहे. (Latest Pune News)

दिलासादायक! खेड तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
11th Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेशाला तांत्रिक अडचणींचे ग्रहण

मागिल वर्षी याच तारखेला धरणात १७.२२ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. कळमोडी धरणात बुधवारी २३.६५ टक्के असणारा पाणी साठा गुरूवारी सकाळी २३.७६ % म्हणजेच ०.३६ टीएमसी इतका आहे. मागिल वर्षी याच तारखेला धरणात १९.८७ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगावर विशेषतः भामनेर आणि भिमनेर खोऱ्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत मागील अठवड्यापासून वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असल्यामुळे भिमा, भामा, आरळा या नद्यांसह ओढेहानाले खळाळून वाहत असल्याने धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

दिलासादायक! खेड तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
Crop Damage: पावसाने 26 हजार 165 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वळवाच्या पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत असल्याने छोटे ओढे नाले भरून प्रवाहीत झाले आहे.चासकमान धरण परिसरात एकूण १५०४ मिलिमिटर तर मागिल २४ तासांत ४ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

भामा आसखेड धरण परिसरात एकूण १३७८ मिलिमिटर तर मागिल २४ तासांत ३७ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळमोडी धरण परिसरात एकूण १७९१ मिलिमिटर तर मागिल २४ तासांत २९ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणांत येणारी पाण्याची आवक पहाता या वर्षे धरण लवकरच भरणार असल्याची आशा शेतकऱ्यांची पल्लवीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news