पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पितृपक्ष पंधरवड्यास सुरुवात झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. शहरातील मोशी उपबाजार समिती, पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व चिंचवड येथील मंडईमध्ये भाजी पाल्यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. पितृ पंधरवाड्यात पूर्वजांच्या स्मरणार्थ नातेवाईकांना जेवणासाठी बोलावण्याची प्रथा आहे. जेवणात गवार, काकडी, घोसाळी, भेंडी, कारले, शेवगा व अळूच्या भाजीला विशेष महत्व असते. त्यामुळे या भाज्या खरेदीस करण्यास नागरिकांची पसंती आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात कांद्याची आवक 330 क्विंटल झाली होती. त्या तुलनेत रविवारी मोशी उपबाजारात 628 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याची आवक 298 क्विंटलने वाढली आहे. मात्र काद्यांचे दर स्थिर आहेत. बटाट्याची आवक 1307 क्विंटल इतकी झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 821 क्विंटलने आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात 486 क्विंटल इतकी आवक झाली होती.
गेल्या आठवड्यात भेंडी – 103 क्विंटल, टोमॅटो – 338 क्विंटल, तर मटार – 43 क्विंटल इतकी आवक झाली. तर, रविवारी भेंडी 43 क्विंटल, टोमॅटो 369 क्विंटल आणि 21 क्विंटल मटारची आवक झाली मात्र गेल्या आठवड्यापेक्षा दरात वाढ झाली होती.
यामध्ये कोथिंबीर, मेथी प्रत्येकी 8 रुपये, कांदापात प्रत्येकी 14 रुपये दराने गड्डी विकली गेली. शेपू – 9 रुपये, मुळा – 10 रुपये आणि पालक – 8 रुपये तर, पुदिना 4 रुपये गड्डी या दराने विक्री झाली.
पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर
(प्रति जुडी)
मेथी 25 -30
कोथिंबीर 25-30
गावरान कोथिंबीर 35
कांदापात 25-30
शेपु 30
पुदिना 25
मुळा 20
पालक 18
किलोचे भाव
कांदा 30
बटाटा 35
लसूण 45
भेंडी 70
गवार 85
टोमॅटो 35
दोडका 60
हिरवी मिरची 60
कोल्हापुरी मिरची 70
दुधी भोपळा 50
लाल भोपळा 40
काकडी 40
कारली 50
फ्लॉवर 60
कोबी 30
काटेरी वांगी 50
भरीताची वांगी 40
शेवगा 250
गाजर 50
आले 50
ढोबळी मिरची 40
घोसाळी 80-100
मटार (गोल्डन) 80
घेवडा (श्रावणी) 80