पिंपरी : मटार, आले, लसूण, बिन्सच्या दरात वाढ

पिंपरी : मटार, आले, लसूण, बिन्सच्या दरात वाढ

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाजारपेठांमध्ये मिरची, मटार, आले, लसूण व बिन्स आदी भाज्यांचे उत्पादन वाढत्या तापमानामुळे घटल्याने गेल्या आठवड्यापासून दरात वाढ कायम आहे. तसेच नाशिक येथील चविष्ट आणि हिरवी काकडी बाजारात उपलब्ध विक्रीस आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडई व आकुर्डी येथील किरकोळ बाजारात कोथिंबीर 15 ते 20, पालक 10, मेथी 10, कांदापात 15, शेपु 10 तर पुदीना 10 रूपये दराने जुळीची विक्री झाली.

तसेच आल्याचे दर 100, लसूण 100, बिंस 90, हिरवी मिरची 80, मटार 90, तर काकडी 40 रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर कांदा 25 रूपये व टोमॅटो 10 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली मोशी उपबाजारात कांद्याची आवक 375 क्विंटल, बटाटा 334 क्विंटल, टोमॅटो 485 क्विंटल, मटार 17 क्विंटल, भेंडी 16 क्विंटल, आले 25 क्विंटल, मिरची 86 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

तसेच घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर मिरची 35, कांदा 8 ते 9, बटाटा 8, लसून 35, आले 50, टोमॅटो 5 ते 6, भेंडी 17, मटार 50 रूपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 34500 फळे 436 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2325 क्विंटल एवढी आवक झाली.

लोणच्याचा कैर्‍यांना मागणी

शहरातील मंडईमध्ये मोठया प्रमाणात लोणच्यासाठी लागणार्‍या कैर्‍यांची आवक झाली आहे. उन्हाळा संपता- संपता महिलावर्गाची आंब्याचे लोणचे बनविण्यासाठी लगबग सुरू असते. त्यामुळे कैर्‍यांची मागणी वाढली आहे. मार्केटयार्डमधून कैर्‍यांची आवक शहरातील बाजारपेठांमध्ये झाली आहे. शहरातील मोशी येथील उपबाजारपेठेत शुक्रवारी 53 क्विंटल लोणच्याच्या कैरीची आवक झाली होती. खायला चविष्ट असल्याने घरोघरी जेवणासोबत लोणच्याचा वापर केला जातो. कर्नाटकातील कैरीला ग्राहकांची अधिक मागणी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news