पिंपरी : भोगीमुळे भाज्यांच्या दरात वाढ

पिंपरी : भोगीमुळे भाज्यांच्या दरात वाढ

पिंपरी : पुढारी वृृत्तसेवा :  मकरसंक्रांतीपूर्वी असलेल्या भोगी सणामुळे बाजारात पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भोगीला विविध प्रकारच्या भाजीपाल्याला पसंती असल्याने काही भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पालक, मेथी, कांदापात, चाकवत व कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली आहे. सणासाठी वाटाणा, गाजर, वांगी, बोरे या सर्व फळभाज्यांची आवश्यकता असते. तसेच हरबर्‍याची पेंडीची तीस रुपये दराने विक्री करण्यात येत होती. पालक 30, मेथी 30, कांदापात 30, कोथिंबीर 30 आदी भाज्या दुप्पट दराने विक्री करण्यात आली.

फळांच्या दरात वाढ
भोगी सणाच्या पार्श्वभूमीवर फळांच्या दरात वाढ झाली आहे. बाजारात बोर, संत्री, मोसंबी आणि पेरूच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, या वाढत्या दरामुळे ग्राहक पूजेसाठी आवश्यक फळांची खरेदी करताना आढळून येत होते.

फळे प्रतिकिलो रुपये दराने विक्री
बोर- मोठी -60 ते 80, लहान- 200, संत्री 150 ते 200, सफरचंद – 120 ते 140, मोसंबी- 160 ते 200, पेरू 60 ते 80, सीताफळ – 100 ते 150, चिकू 60 ते 100, डाळिंब- 200 आदी फळांचे दर होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news