पारगाव : कांद्याच्या दरात वाढ

कारफाटा येथे कांदा बाजारपेठेत पाठविण्याची सुरू असलेली लगबग.
कारफाटा येथे कांदा बाजारपेठेत पाठविण्याची सुरू असलेली लगबग.

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोणी उपबाजारात कांद्याला 10 किलोला 255 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. यामुळे शेतकर्‍यांनी बराकीतील कांदे बाजारपेठेत पाठविण्यासाठी लगबग सुरू केली आहे. परंतु, वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने कांदे सडण्याचे प्रमाण वाढले आहे. निम्म्याहून अधिक कांदे फेकून द्यावे लागत आहेत.

मध्यंतरी कांद्याचे भाव स्थिर होते. आता बाजारभावात वाढ झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोणी उपबाजारात दहा किलोला सध्या दोनशे पन्नास रुपयांवर बाजारभाव मिळत आहे. बाजारभावात वाढ झाल्याने शेतकर्‍यांनी बराकीतील कांदा बाजारपेठेत पाठविण्याची लगबग सुरू केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news