पुणे : अपुरा पाणीपुरवठा अन् अस्वच्छता; कॅन्टोन्मेन्टच्या मुख्यालयातील वॉर्डातच सुविधांची वानवा

पुणे : अपुरा पाणीपुरवठा अन् अस्वच्छता; कॅन्टोन्मेन्टच्या मुख्यालयातील वॉर्डातच सुविधांची वानवा
Published on
Updated on

समीर सय्यद

पुणे : कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, कुंभारबावडी मार्केट परिसरातील अस्वच्छता, फॅशन स्ट्रीटची सुरक्षितता या महत्त्वाच्या प्रश्नांसह सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात सुविधांची वानवा असल्याने 'न्यू' मोदीखाना-धोबीघाट वॉर्डाची स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून
'जैसे थे' आहे.

वॉर्ड क्रमांक चारमधील रस्त्याची झालेली दुरवस्था.
वॉर्ड क्रमांक चारमधील रस्त्याची झालेली दुरवस्था.

वॉर्ड क्रमांक चारमध्ये आझम कॅम्पस महाविद्यालय, शाळा, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय, पुणे कॅन्टोन्मेन्ट मुख्यालय, फॅशन स्ट्रीट मार्केट आहे. पाणीटंचाई वॉर्डातील प्रमुख समस्या असून, जुनाट, ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांमधून पाणीगळती होते. त्यामुळे पाणी कमी दाबाने येते. बौद्ध विहार, न्यू मोदीखाना, जान महंमद स्ट्रीटवरील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.

सांडपाणी वाहिनीची स्वच्छता करताना कर्मचार्‍याने सुरक्षा साहित्यांचा वापर केलेला नाही.
सांडपाणी वाहिनीची स्वच्छता करताना कर्मचार्‍याने सुरक्षा साहित्यांचा वापर केलेला नाही.

फॅशन स्ट्रीटच्या अग्निसुरक्षेचा, तसेच अनधिकृत गाळेधारकांचा प्रश्न अद्याप बोर्डाला निकालात काढण्यात आलेला नाही. वॉर्ड चारमध्ये कॅन्टोमेंन्ट बोर्ड, सरदार पटेल रुग्णालय, अग्निशमन विभाग असून, येथे काम करणार्‍या कामगारांचे घर आहेत. मात्र, त्यांना भौतिक सुविधाही मिळत नाहीत.

वॉर्ड चारमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून, जनावरांच्या गोठ्याजवळ चेंबर तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे येथील नागरिक आणि ये-जा करणार्‍या वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात अनेक वेळा बोर्डाला पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. रस्त्यावर खड्डे पडले असून, अपघात होण्याची शक्यता आहे.

                                     – अनिता मकवाणी, सामाजिक कार्यकर्त्या.

आमच्या वॉर्डात कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे मुख्यालय असून, त्यासमोरच सरदार पटेल रुग्णालय आहे. परंतु, या रुग्णालयातील आयसीयू आणि रक्ताच्या चाचण्यांचे काम खासगी कंपनीला दिले आहे. अनावश्यक चाचण्या रुग्णांच्या माथी मारल्या जात आहेत. बोर्डात मनुष्यबळ अपुरे असून, कंत्राटी कामगारांवर काम चालत असून, त्याचा फटका विकासकामांना बसत आहे. त्यामुळे नवीन भरती होणे अपेक्षित आहे.

                                       – धीरज चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news