राजगुरूंच्या भूमीत फ्लेक्स सांगु लागले देशभक्तीचा इतिहास..

राजगुरूंच्या भूमीत फ्लेक्स सांगु लागले देशभक्तीचा इतिहास..
Published on
Updated on

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडिया आणि डिजिटल क्रांतीमुळे सध्याच्या काळात नेता, कार्यकर्ता आणि भाईंचे फ्लेक्स पाहायची सवय नागरिकांना झाली आहे. मात्र, राजगुरुनगर शहरात शुक्रवारी (दि. 22) यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान अथवा बलिदान दिलेल्या देशभरातील क्रांतिकारकांचे फोटो, नाव आणि बलिदान दिवस व कार्याचा गौरव करणारे फ्लेक्स शहराच्या बाजारपेठेत झळकले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणार्‍या क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांचा 94वा शहीद दिन शनिवारी (दि. 23) आहे.

त्यानिमित्त खेड तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी  प्रेरणादायी इतिहास फ्लेक्सद्वारे जनतेच्यासमोर आणला आहे. हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, बाबू गेनू सैद, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, मंगल पांडे, अरविंद घोष, मदनलाल धिंग्रा आदी क्रांतिकारकांच्या फ्लेक्सचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचा बलिदान दिन शहरात विविध ठिकाणी अभिवादनाने साजरा होणार आहे. सकाळी नऊ वाजता राजगुरुनगर बस स्थानक परिसरातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग,सुखदेव यांच्या स्मृती शिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

हुतात्मा स्मारक, भीमा नदीतीरावरील राजगुरू वाड्यावर अभिवादन कार्यक्रम होणार आहे. येथे सकाळी दहा वाजता ध्वजारोहण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी बजरंग दलाच्या वतीने शहरातून दरवर्षीप्रमाणे भव्य मशाल मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, बजरंग दलाचे अ‍ॅड. नीलेश आंधळे , कोंडिबा टाकळकर यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news