

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे परंतु शहरात,स्टेशन परिसरात तळेगाव-चाकण महामार्गावर,स्टेशन चौकात,स्वप्ननगरीजवळ,अनेक उपनगर अशा अनेक ठिकाणी खोलगट जागी तसेच खाचखळग्यात पाणी साचलेले असुन त्यास तळ्याचे स्वरूप आलेले आहे.
ते अत्यंत धोकादायक झाले आहे. उघडीप झाल्यामुळे या साचलेल्या पाण्यात भोवतालचे नागरी वसाहतीतील लहान मुले, बालके,चिमुकले पाण्यात खेळतात यामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता आहे.यापुर्वी असे प्रकार घडून जीवीतहानी झालेली आहे तरी प्रशासनाने दखल घेवून अशा अप्रिय घटना घडण्यापुर्वीच खोलगट जागा,खाचखळगे,खड्डे अशा धोकादायक ठिकाणाची तातडीने दखल घेण्यात येवून कार्यवाही करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.