पिंपरी : आधारकार्ड असून अडचण नसून खोळंबा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

वाकड : पुढारी वृत्तसेवा :  'एक देश एक कार्ड' या योजनेअंतर्गत आधार कार्ड चालू झाले. परंतु काही ठिकाणी आधार कार्ड हे सहायक ठरण्याऐवजी अडचण ठरू लागले आहे.  एक व्यक्ती नवीन बँक खाते उघडण्यासाठी बँकेमध्ये गेली असता आधार कार्डच्या फिंगरप्रिंट मॅच होत नव्हत्या. त्या मॅच करण्यासाठी बराच प्रयत्न केला असता पाठीमागे ग्राहकांच्या रांगा लागल्या. तसेच दुसरा पर्याय हा मतदान ओळखपत्राचा होता. ते दाखवल्यावर त्यावर जन्मतारीखच नाही. तोही पर्याय चालला नाही. आधार कार्डमध्ये आय कॅप्शन आणि फोटो डिटेक्शन हे पर्याय आहेत. परंतु हे दोन्ही पर्याय बँकांमध्ये उपलब्ध नाहीत. या कारणांमुळे बँकेत नवीन बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अडचणी कोणासमोर मांडायच्या? हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडलेला आहे. सरकारी बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी या डिजिटल युगात सुद्धा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

कष्टकर्‍यांचे ठसे बदलतात…

काम करणार्‍यांच्या हातावरील बोटांचे ठसे पुसले जात असल्यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, पेन्शन धारकांना याचा नाहक सहन करावा लागत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना, पेन्शन काढणार्‍या व्यक्तींना वय झाल्यामळे त्यांच्या बोटांचे ठसे पुसले जात असल्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

'… एक रेशन'चा फायदा नाही

यूएआयडीएआयकडून आधार कार्डद्वारे मोफत रेशन मिळविण्याची सुविधा देण्यात आल्याने स्थलांतरित लाभार्थींना याचा मोठा फायदा होत आहे. आधार कार्डद्वारे देशभरात कुठूनही रेशन (अन्नधान्य) मिळविता येते. परंतु हे स्थलांतरित झालेले नागरिक किंवा कामगारांच्या हाताची ठसे व्यवस्थित येत नसल्यामुळे रेशन मिळण्यासाठीसुद्धा मोठी अडचण येेत आहे.

ऑनलाईन सुविधा त्रासदायक

आधार कार्डवरील पत्ता बदलायचा असेल तर ऑफलाईन केंद्रावरील कर्मचारीच सांगता फक्त पत्ता, वय किंवा जन्मतारखेतील दुरुस्ती करायची असेल तर 'एमआधार' या अ‍ॅपवरून ते करता येते. मात्र, हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून त्यावरून केले असता सर्व प्रक्रिया (प्रोसेस) होते. त्याचे विविष्ट शुल्कही भरले जाते. मात्र, साधारण 30 दिवसांनी तुम्हाला एखादा मेसेज येतो की, तुमची रिक्वेस्ट रिजेक्ट करण्यात येत आहे. तसेच तुमचे पैसे लवकरच रिफंड होतील. पैसे परत येतातही. पण पत्ता किंवा वय अपडेट होत नाही. या तांत्रिक अडचणी त्रासदायक ठरतात.

मी बँकेमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी गेले असता आधार कार्ड व्हेरिफिकेशन करताना हातांची ठसे व्यवस्थित नसल्यामुळे अडचण आली. दुसरा पर्याय म्हणून वोटिंग कार्ड दिले. तर, त्यावरसुद्धा बर्थ डेट नसल्यामुळे ते कार्डही व्यर्थ ठरले. आधार कार्ड केंद्रावर गेलो असता तिथे आय डिटेक्ट मशीन होते. परंतु ते मशीन बँकांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे हा पर्यायही कुचकामी ठरला.
                                                                    -माधुरी राऊत, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news