पुणे शहरात 40 टक्के मुलांना लशीचा एकही डोस नाही

पुणे शहरात 40 टक्के मुलांना लशीचा एकही डोस नाही
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण, 18 वर्षांवरील नागरिक आणि त्यानंतर 15 ते 18 आणि 12 ते 14 वर्षे वयाच्या मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, 18 वर्षांखालील 40 टक्के मुले अद्याप लसीकरणापासून दूरच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लसीकरणाबाबतचे गांभीर्य कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. याचा परिणाम 18 वर्षांखालील मुलांच्या आणि 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या बुस्टर डोसवर झाला आहे.

शासनाच्या आकडेवारीनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या केवळ 58 टक्के मुलांनी पहिला डोस घेतला आहे. या वयोगटातील 2 लाख 77 हजार 400 पात्र लाभार्थी होते. त्यातील एक लाख 13 हजार म्हणजे 40 टक्के मुलांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. मुलांच्या शाळा आणि महाविद्यालयाच्या वेळा, पालकांची उदासीनता, कोरोनाचे कमी झालेले प्रमाण आणि लसीच्या एक बाटली उघडल्यावर द्यावे लागत असलेले 20 डोस अशा विविध कारणांमुळे लसीकरणाचे प्रमाण घटले आहे.

महापालिकेने शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबवली, शाळांबाहेर मोबाइल व्हॅन उभ्या करण्यात आल्या होत्या. समुपदेशनही केले, शाळांनीही आवाहन केले, त्यामुळे या सगळ्या उपाययोजना करूनही लस घेणार्‍यांची टक्केवारी कमी असल्याचे दिसून येते. महापालिकेने 12 ते 14 वर्षे वयोगटातील अंदाजे एक लाख चार हजार 572 पात्र मुलांपैकी 43 हजार 729 मुलांचे 12 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण केले आहे.

ही टक्केवारी 41 टक्के आहे. केवळ 28 हजार 863 मुलांनीच दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय 15 ते 18 वयोगटातील एक लाख 72 हजार 828 पात्र मुलांपैकी 1 लाख 19 हजार 821 मुलांनी पहिला डोस घेतला आहे. ही टक्केवारी 69 टक्के आहे. पहिला डोस घेतलेल्या मुलांपैकी 80 हजार 939 मुलांनी दुसरा डोसही घेतला आहे, त्यामुळे ती टक्केवारी 46 आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news