दीड वर्षात विकासकामांमुळे मतदारांचा विश्वास वाढला; रवींद्र धंगेकर यांचे प्रतिपादन

Maharashtra Assembly Polls: धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 17 मध्ये पदयात्रेतून मतदारांशी संवाद साधला.
Ravindra Dhangekar News
दीड वर्षात विकासकामांमुळे मतदारांचा विश्वास वाढला; रवींद्र धंगेकर यांचे प्रतिपादन Pudhari
Published on
Updated on

Pune Politics: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखवून मला निवडून दिले. या आमदारकीच्या दीड वर्षाच्या काळात मतदारसंघात जे काम केले, त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला असून, त्यातूनच आपल्याला पुन्हा पाच वर्षांसाठी निवडून देण्याचा निर्णय येथील मतदारांनी घेतला असल्याचे प्रतिपादन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.

Ravindra Dhangekar News
मते विकत घेणार्‍यांना बहिणीच धडा शिकवतील : प्रणिती शिंदे

धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 17 मध्ये पदयात्रेतून मतदारांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी धंगेकर यांनी आमदारकीच्या काळात केलेली लोकोपयोगी कामे, तसेच त्याआधीही बरीच वर्षे नगरसेवक म्हणून केलेली कामे याचे आम्ही साक्षीदार आहोत, त्यामुळे आम्ही खंबीरपणे धंगेकर यांच्याच पाठीशी पुन्हा उभे राहणार अशी ग्वाही दिली.

Ravindra Dhangekar News
स्वाभिमानीचे सावकर मादनाईक यांच्यासह पदाधिकारी महायुतीबरोबर; शेट्टी यांना धक्का

या वेळी धंगेकर यांनीही कसबा मतदारसंघात जो विकासाचा मोठा बॅकलॉग राहिला आहे, तो येत्या पाच वर्षांत आपण निश्चित भरून काढू असे प्रतिपादन केले. या पदयात्रेत रवींद्र माळवदकर, वीरेंद्र किराड, चंद्रकांत मिठापल्ली, रवि रच्चा, विशाल धनवडे, सुनील पडवळ, नितीन गोंधळे, हेमंत येवलेकर, भाई कात्रे, योगेश आंदे, विशाखा निंबाळकर, शिवराज माळवदकर आदी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news