

In Narayangaon, the new branch of the Parag Urban Cooperative Credit Society will be inaugurated on April 20
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
पराग नागरी सहकारी पतसंस्थेच्या नारायणगाव येथील नवीन शाखेचा शुभारंभ सोमवार, दि. २० एप्रिल रोजी होणार आहे. माजी सहकार मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून अध्यक्षस्थानी आमदार शरद सोनवणे असणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बांगर उपाध्यक्ष सचिन शहा यांनी दिली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडाचे पुणे विभाग प्रमुख व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजयराव काळे उपस्थित राहणार आहेत.
तसेच पांडुरंग पवार, अमित बेनके, शुभदा वावळ, जिल्हा परिषद सदस्या नेहा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे , विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्या सुषमा वावळ, जयश्री बनकर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका राजश्री बोरकर, वारूळवाडीचे माजी सरपंच विनायक भुजबळ उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय आंबेगावचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, जुन्नरचे सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख तसेच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे हेही कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
दरम्यान पराग पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असल्याने संस्थेचे विस्तारीकरण झपाट्याने होत असून मंचर, पराग कंपनी शाखा, नारायणगाव या ठिकाणी तीन शाखा सुरू झाल्या असून लवकरच शिंगवे पारगाव, जांबुत, राजगुरुनगर व ओतूर या ठिकाणी नवीन शाखा सुरू होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी यांनी दिली.