

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ ते ११ या वेळेत चिंचवड मतदार संघातील मतदारांनी चांगलाच वेग घेतला आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेत चिंचवड मतदार संघात केवळ 3.52% मतदान झाले होते, तर दुसऱ्या दोन तासांमध्ये चिंचवड मतदारसंघामध्ये 10.45% मतदान झाले आहे.