Crime News| इंदापूरच्या भांडगांवमध्ये महिलेसह, लहान मुलांवर सत्तूरने वार
पुणे: इंदापूर तालुक्यातील भांडगावमध्ये एकाने दारुच्या नशेत 30 वर्षीय महिलेवर आणि दोन लहान बाळांवर सत्तूराने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
दारुच्या नशेत सत्तूराने वार
आरोपी जेव्हा हे वार करत होता तेव्हा गावकऱ्यांनी हे कृत्य पाहिलं आणि या आरोपीला पकडून गावकऱ्यांनी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
सुरेश उमाजी मदणे ऊर्फ गोट्या असं आरोपीचं नांव असून, इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितलं आहे.
तीन वर्षाची मुलगी जखमी
या घटनेत तीन वर्षाची प्रियल लक्ष्मण चव्हाण ही लहान मुलगी जखमी झाली असून, तीच्या मानेवर मागील बाजूस जखम झाली आहे. तिच्यावर सध्या अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर सोनाली शाम जाधव ही ३० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, तिचा दिड वर्षाचा मुलगा शिवांश शाम जाधव हा जखमी झाला आहे. या दोघांवर सध्या इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

