राम मंदिराच्या छताला खरचं गळती लागली आहे का? मंदिराच्या सचिवांनी केला खुलासा

मंदिराच्या बांधकामात निष्काळजीपणा?
Ayodhya Ram Mandir Updates
राम मंदिराच्या छताला खरचं गळती लागली आहे अशी माहिती समोर आली होती. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात पाण्याचा एक थेंबही शिरला नाही, असा दावा रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी बुधवारी (दि.२६) केला.

काय म्हणाले चंपत राय?

Summary
  • बांधकाम चालू असलेल्या कामामुळे नाल्याच्या पाईपमधून पाणी येते होते.

  • राममंदिराच्या गर्भगृहात पाण्याचा एक थेंबही शिरला नाही.

  • मंदिर परिसरातून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.

गर्भगृहात पाण्याचा एक थेंबही शिरला नाही

जानेवारी महिन्याच्या २२ तारखेला अयोध्यातील राम मंदिरात राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित पार पडला. काहीच महिन्यांच्या कालावधीत मंदिरात पाणी गळत असल्याती माहिती समोर आली. दरम्यान अयोध्या राम मंदिर तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी बुधवारी (दि.२६) दावा केला आहे की, मंदिराच्या गर्भगृहात पाण्याचा एक थेंबही शिरला नाही.

चंपत राय असेही म्हणाले की, "छतावरून पाणी गळत असल्याचे दिसून येत असले तरी, मंदिराच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामामुळे ते नलिकेच्या पाईपमधून येत होते. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर परिसरात पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती, जी पुनर्भरण खड्ड्यात वाहिली जात होती. मंदिराच्या बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही,”. Ayodhya Ram Mandir Updates

मंदिराच्या बांधकामात निष्काळजीपणा

अयोध्या मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सोमवारी (दि.२४) सांगितले होते की, पावसाळ्याच्या पहिल्या मुसळधार पावसानंतर राम मंदिराच्या गर्भगृहाच्या छताला गळती लागली होती. हिंदू देवता रामाच्या मूर्तीसमोर पुजारी बसलेल्या थेट वरच्या छतावरून पावसाचे पाणी गळत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मंदिराच्या बांधकामात निष्काळजीपणाचा आरोपही दास यांनी केला होता आणि मंदिर परिसरातून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचा दावा केलेला.

अयोध्येतील नागरी सुविधांच्या विकासात भ्रष्टाचार

दास यांच्या दाव्यानंतर काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रमुख अजय राय यांनीही सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर मंदिराच्या बांधकामात आणि अयोध्येतील नागरी सुविधांच्या विकासात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news