धरणातून पाणी गावापर्यंत आले, पण आमच्या सोसायट्या, वस्त्या कोरड्याच राहिल्या...

वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांची भावना
Water issue
पाणी file photo
Published on: 
Updated on: 

वडगाव शेरी मतदारसंघात प्रदीर्घ काळ जाणवत असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी भामा आसखेड योजना आखण्यात आली. पण मागील 10 वर्षांत हे पाणी नागरिकांपर्यंत पोचवण्यात यंत्रणा अपयशी ठरली आणि त्यामुळेच पाणी उशाशी, पण आम्ही उपाशी असे म्हणण्याची पाळी या भागातील नागरिकांवर आली आहे.

वडगाव शेरी मतदारसंघातील भागांमध्ये नळांना मध्यरात्री अगदी थोडा वेळ पाणी येत होते. त्यामुळे भामा-आसखेड योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी अनेक वर्षे होत होती. ती मान्य झाली आणि तिची अंमलबजावणीही झाली. परिणामी, वडगाव शेरी, खराडी, कल्याणीनगरपासून येरवड्यापर्यंतच्या भागापर्यंत पाणी येऊन पोहोचलेही, पण गावात पाणी आले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचू शकले नाही. याचे कारण जलवाहिन्या, पाणीपुरवठा केंद्रे आदी पायाभूत सुविधा उभारण्यात महापालिकेच्या यंत्रणेला अपयश आले. पाणीपुरवठ्याच्या योजनेचे नियोजन, त्यावर नियंत्रण, तिचे मूल्यमापन आदींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. पाणी यंत्रणांची दुरुस्ती आणि तिची स्वच्छता यांकडेही यंत्रणांनी लक्ष दिले नव्हते.

माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कार्यकाळात भामा आसखेड पाणीयोजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तसेच लष्कर पाणीपुरवठा योजनेतून परिसरासाठी त्याचप्रमाणे विश्रांतवाडी, विमाननगर आणि इतर भागांसाठी होळकर पाणीपुरवठा योजनेतून पाणी आणण्यासही गती देण्यात आली. खराडी, येरवडा, धानोरी, मांजरी खुर्द, वडगाव शेरी येथे पाण्याच्या टाक्या उभारण्याची योजनाही पुढे सरकवण्यात आल्याने पाणीप्रश्न संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली होती, अशी माहिती या भागातील काही नागरिकांनी दिली.

पाणी असूनही ते मिळत नसल्याने मोठमोठ्या सोसायट्यांमधील, वस्त्यांमधील नागरिकांचे हाल होऊ लागले. त्यामुळे नाइलाजाने टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाणीच उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा एक दिवसाआड करावा लागला. टँकरने येणारे पाण्याचे बिल पाच ते सहा लाख एवढे येऊ लागले. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागू लागला. मोठी आयटी सिटी असताना महापालिका किमान पाणीही पुरवू शकली नाही. त्यामुळे महापालिकेची बेअब्रू झालीच, पण त्याचबरोबर नागरिकांचे प्रचंड हाल झाले

पाणीटंचाईचा सामना करावा लागणारे भाग व सोसायट्या

लोहगाव, कळस, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, येरवडा, निरगुडी, साईनाथनगर, राजमुद्रा चौक, अष्टविनायक चौक, वाढेश्वरनगर, राजश्री कॉलनी, मुनूरवार सोसायटी, ओम गंगोत्री सोसायटी, वेंकटेशकृपा सोसायटी, बाजीरावनगर, घरकुल सोसायटी, महादेवनगर, सिद्धेश्वरनगर, चव्हाणनगर, खराडी, दत्त मंदिर परिसर, थिटेनगर, विडी कामगार वसाहत, चंदननगर, बोराटे वस्ती, गणेशनगर, अनुसया पार्क, तुळजाभवानीनगर, शेजवळ पार्क, खराडकर पार्क, क्रांती पार्क, एकनाथ पठारेवस्ती, वृंदावन सोसायटी, सोनाई पार्क, थिटे वस्ती.

वडगाव शेरी मतदारसंघातील पाणीटंचाईचा उग्र प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या आमदारपदाच्या कार्यकाळात भामा-आसखेड योजनेला गती दिली. मात्र, त्यानंतरच्या काळात पाणी वितरणाची यंत्रणाच उभी राहू शकली नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या विरोधात आपण पुन्हा लढा उभारणार आहोत.

बापूसाहेब पठारे, माजी आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news