कांदा, बटाट्याची आवक वाढली; पिंपरी मंडईत गावरान गवारचे दर वाढले

कांदा, बटाट्याची आवक वाढली; पिंपरी मंडईत गावरान गवारचे दर वाढले
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मोशी उपबाजारात कांदा आणि बटाटा यांची आवक वाढली आहे; मात्र दरात कोणताही बदल झालेला नाही. टोमॅटो, कोबी यांचीही आवक वाढली आहे. पिंपरी येथील भाजी मंडईत कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गावरान गवारची आवक कमी झाल्याने त्यांचे दर वाढले आहेत.

मोशी उपबाजारामध्ये गेल्या आठवड्यात कांदा 538 क्विंटल आणि बटाटा 521 क्विंटल इतकी आवक झाली होती. त्या तुलनेत रविवारी (दि. 12) कांदा – 779 क्विंटल तर, बटाटा 659 क्विंटल इतकी आवक झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची 241 क्विंटल तर, बटाट्याची 138 क्विंटल इतकी आवक वाढली आहे. आवक वाढली असली तरी दरामध्ये बदल झालेला नाही. दर स्थिर आहेत.

टोमॅटो – 519 क्विंटल, कोबी – 171 क्विंटल यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. तर, काकडी – 140 क्विंटल आणि फ्लॉवर -168 क्विंटल इतकी आवक झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक कमी झाली आहे. टोमॅटोची आवक वाढल्याने किलोमागे सरासरी एक रुपया इतका दर कमी झाला आहे. तर, फ्लॉवरची आवक कमी झाल्याने किलोमागे सरासरी एक रुपयाने दरवाढ झाली आहे. मोशी उपबाजारात रविवारी 3 हजार 320 क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर, 53 हजार 400 गड्ड्या इतकी पालेभाज्यांची आवक झाली आहे.

पालेभाज्या दर (प्रति जुडी)
मेथी 10
कोथिंबीर 5 ते 10
कांदापात 10
शेपू 10
पुदिना 5
मुळा 10-15
चुका 10
पालक 10

फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 20
बटाटा 25
लसूण 80-100
आले 70
गवार 110
पडवळ 60
फ्लॉवर 50
कोबी 20
गाजर
(महाबळेश्वर) 30-35
(दिल्ली) 30-35
काकडी 40
गवार 120-130
दोडका 60
दुधी भोपळा 40
लाल भोपळा 20-25
कारली 60-70
वांगी 30-40
भरीताची वांगी 35-40
तोंडली 40

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news