पुणे : 5 लाख 52 हजार मूर्तींचे विसर्जन; गतवर्षीच्या तुलनेत मूर्ती वाढल्या

पुणे : 5 लाख 52 हजार मूर्तींचे विसर्जन; गतवर्षीच्या तुलनेत मूर्ती वाढल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या गणेशोत्सवात महापालिकेने व्यवस्था केलेल्या विसर्जन हौद आणि मूर्ती संकलन केंद्रात एकूण 5 लाख 52 हजार 432 गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत एक लाख 30 हजाराने अधिक आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 3 लाख 10 हजार 158 मूर्तींचे विसर्जन झाले, तर 562.6 टन निर्माल्य संकलन झाले.

गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने पहिल्या दिवसांपासूनच विविध प्रकारच्या व्यवस्था सज्ज केल्या होत्या. यामध्ये 303 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करत 150 फिरते विसर्जन हौद, 46 बांधीव हौद, 360 लोखंडी टाक्या, 216 मूर्ती संकलन व दान केंद्र आदींची व्यवस्था केली होती.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये शहरात एकूण 5 लाख 52 हजार 432 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या मूर्ती संकलन व दान केंद्रात 85,993, फिरत्या हौदामध्ये 54,703, लोखंडे टाक्यांमध्ये 2 लाख 1 हजार 447, बाधिव हौदामध्ये 87 हजार 948 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

निर्माल्य संकलन वाढले
महापालिकेने आपल्या सर्वच विसर्जन ठिकाणांवर आणि मूर्ती संकलन केेंद्रांवर निर्माल्या संकलनाची व्यवस्था केली होती. निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टीचा समावेश असावा. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, कालव्यात किंवा तलावात टाकू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले होते. याला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून 567 टन निर्माल्य संकलित करण्यात आला. गतवर्षी अडीचशे टन निर्माल्य संकलन झाले होते.

गतवर्षीच्या व यंदाच्या तुलनात्मक आकडेवारी
वर्षे संकलित मूर्ती हौदात विसर्जित मूर्ती एकूण विसर्जित मूर्ती निर्माल्य संकलित (किलो)
2021 106316 144805 251121 292677
2022 85993 344098 430091 562645

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news