

IMD issues heavy rain alert from today
पुणे: राज्यात सुस्तावलेला मान्सून आज बुधवार (दि. 13) पासून वेगाने सक्रिय होत आहे. त्यामुळे 13 ते 18 ऑगस्टदरम्यान 13 जिल्ह्यांना अतिवृष्टी (ऑरेंज अलर्ट), तर उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागाला मुसळधार (यलो अलर्ट) पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
देशातील विविध भागांत पुढील सात दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. याच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
पूर्व आणि मध्य भारतासह उत्तर द्वीपकल्पीय भागात मान्सून बुधवार (दि. 13 ऑगस्ट) पासून सक्रिय होत असून, 18 ऑगस्टपर्यंत देशाच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत जोर राहणार आहे. फक्त उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे.
मान्सून सक्रिय होण्याची कारणे
मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाल्याने मोठा पाऊस
मान्सूनचा ट्रफ सध्या पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी
बंगालच्या उपसागरात मध्य भागात हवेचे चक्राकार अभिसरण
काश्मीरमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय
पश्चिम मध्य, वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र
आगामी 48 तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता
...असे आहेत अतिवृष्टीचे अलर्ट
मध्य महाराष्ट्र : 13 ते 18 ऑगस्ट
कोकण : 15 ते 18 ऑगस्ट
मराठवाडा : 13 ते 16 ऑगस्ट
विदर्भ : 13 ते 18 ऑगस्ट