

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत गुरुवारी जोरदार पाऊस बरसला. असाच पाऊस शुक्रवारी बरसणार असून, शनिवारपासून कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित भागांतून पाऊस किंचित कमी होण्याचा अंदाज आहे. (Latest Pune News)
ऐन गणेशोत्सवात संततधार पाऊस सुरू झाला आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, तर संपूर्ण राज्याला यलो अलर्ट होता. त्यामुळे गुरुवारी राज्यात सर्वदूर मध्यम पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या दुसर्या दिवशीही नागरिकांनी रेकोट, छत्री घेऊनच बाप्पाचे देखावे पाहण्याचा आनंद लुटला. असाच पाऊस कोकण आणि मध्य महाराष्ट्रत 2 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, 30 ऑगस्टपासून उर्वरित भागांतील पाऊस कमी होईल, असा अंदाज आहे.