

शिक्रापूर : पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत दि. 16 जून रोजी रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील गट नंबर 1111 व 1134 येथील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
व्यापारी स्वरूपाचे सुमारे 4500 चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच शिक्रापूर येथील गट नंबर 811 व 812 येथे 5500 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. एकाच दिवशी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परवानगीशिवाय कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये, असे आवाहन बन्सी गवळी, नियंत्रक तथा सहआयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग यांनी केले आहे