पुणे : सावधान; नियमभंग कराल तर वाहन जप्ती

पुणे : सावधान; नियमभंग कराल तर वाहन जप्ती

प्रसाद जगताप

पुणे : मोटार वाहन कायद्याचा नियमभंग केला, तर आरटीओकडून दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीचीदेखील कारवाई केली जाते. अशीच कारवाई आरटीओने आर्थिक वर्षात केली होती. त्यातील 48 वाहनांचा लिलाव नुकताच करण्यात आला, त्यातून आरटीओला 79 लाख 5 हजार 700 रुपयांचा महसूल मिळाला.

70 वाहने शिल्लक

आरटीओकडे आर्थिक वर्षात जप्त केलेल्या वाहनांसह मागील वर्षातील काही वाहने होती. त्यापैकी काही वाहनांचा लिलाव झाला. आता वाघेश्वर पार्कींग वाघोली, आळंदी आरटीओ कार्यालय, पुणे आरटीओ कार्यालय, शिरूर एसटी डेपो, स्वारगेट एसटी डेपो या ठिकाणी ठेवलेली एकूण 70 वाहने शिल्लक आहेत.

यामुळे वाहने जप्त…

शहरातील वाहनचालकांनी मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचे पालन न केल्यास आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहनचालकांवर वाहन जप्तीची कारवाई करते. यात परिवहन संवर्गातील वाहनांचा थकीत कर, वाहनांची योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस टेस्ट) चाचणी नसणे, ओव्हर लोड वाहने, यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाते.

जप्त वाहने ठेवण्यासाठी आणखी नऊ जागा मिळणार

आरटीओ, पोलिसांना महापालिका प्रशासनाने शहरातील नऊ ठिकाणांच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात बालेवाडी दसरा चौक, बालेवाडी मिटकॉन चौक, बाणेर ओटा मार्केट गोडाऊन, मगरपट्टा, सर्वे नंबर 40 खराडी, हडपसर जे एस पी एम गोडाऊन, पॅरामाउंट सोसायटी गोडाऊन, हडपसर शुभारंभ बिल्डिंग, कोंढवा खडीमशीन या ठिकाणी जागा मिळाल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news