Baramati News: आणखी एका 'वैष्णवी'चा मृत्यू! पती करायचा इतर मुलींशी चॅट,त्रासाला कंटाळून 22 वर्षांच्या तरुणीने आयुष्य संपवलं

girl ends life due to harassment: समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचाच त्याने अनन्वित छळ सुरु केला
Pune news
महिलेने जीवन संपवले Pudhari
Published on
Updated on

बारामती : ते दोघेही वेगवेगळ्या जातीचे... तरी तिने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्याशी आंतरजातीय विवाह केला. परंतु लग्नानंतरही त्याने इतर मुलीशी चॅटींग करत संपर्क ठेवले. थेट दुसऱ्या मुलीला घरी आणण्यापर्यंत त्याची मजल गेली, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचाच त्याने अनन्वित छळ सुरु केला. यामुळे व्यथित झालेल्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आता तिच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजी माणिक देडे (रा. मासाळवाडी, ता. बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर श्रेया शिवाजी देडे (लग्नापूर्वीचे नाव : श्रेया रामचंद्र जाधव, वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

राज्यात एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असताना बारामती तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मयत श्रेया हिची बहिण प्रितम रामचंद्र जाधव (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली.

Pune news
Khed News: पाईट येथे मासेमारी करताना वीज कोसळून आदिवासी युवकाचा मृत्यू

फिर्यादीची बहिण श्रेया हिने शिवाजी देडे याच्याशी नऊ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. परंतु विवाहानंतरही तो सानिया कुरेशी या मुलीशी लग्न केल्याचे सांगत तिला घरी घेवून आला. तसेच तिच्याशी इन्टाग्राम व व्हाटसअपवर चॅटींग केले. यामुळे पत्नी श्रेया हिने पतीला विचारणा केली, समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्याने तिचे न एेकता तिलाच शारिरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून अखेर श्रेया हिने शनिवारी (दि. २४) रोजी दुपारी राहत्या घरात लोखंडी अॅंगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. प्रेमविवाह केल्यानंतर शिवाजी याच्या वागण्यामुळेच एका तरुण मुलीला आपले जीवन संपवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news