HPV Vaccination Pune District: ‘सर्व्हायकलमुक्त पुणे’ची दिशा! ९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लस

पुणे जिल्हा परिषद व ‘जीविका फाउंडेशन’चा करार; महिलांच्या कर्करोग प्रतिबंधासाठी उपक्रम दिवाळीनंतर सुरू
kolhapur | जिल्ह्यातील सर्व मुलींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लस देणार
kolhapur | जिल्ह्यातील सर्व मुलींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लस देणारPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे : ग्रामीण भागातील 9 ते 14 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस दिली जाणार आहे. यासंदर्भात ‌‘जीविका फाउंडेशन‌’सोबत करार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. (Latest Pune News)

kolhapur | जिल्ह्यातील सर्व मुलींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लस देणार
Kedgaon Zilla Parishad Election: केडगावमध्ये थोरात घराण्यांत ‘हाय व्होल्टेज’ लढत? तुषार थोरात विरुद्ध अभिषेक थोरात यांची शक्यता चर्चेत

पुणे जिल्हा परिषदेने ‌‘जीविका फाउंडेशन‌’सोबत ‌‘सर्व्हायकलमुक्त पुणे‌’ या सर्वसमावेशक आरोग्य उपक्रमासाठी सामंजस्य करार केला आहे. या करारावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जीविका फाउंडेशनचे संचालक जिग्नेश पटेल यांनी स्वाक्षरी केली. या कराराच्या माध्यमातून 9 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस विनामूल्य दिली जाणार आहे. तसेच, सर्व अविवाहित महिलांची तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आजाराचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार करणे शक्य होणार आहे. पाटील म्हणाले, ‌‘हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी तसेच कर्करोग प्रतिबंधासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

kolhapur | जिल्ह्यातील सर्व मुलींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लस देणार
ISRO Scientist Eknath Chitnis: ‘इस्रो’चे शिल्पकार डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; अवकाश संशोधनातील युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व हरपले

हा उपक्रम शासनाच्या प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणांना आणि जनजागृतीच्या उद्दिष्टांना पूरक आहे. या उपक्रमाचा किशोरवयीन मुली आणि महिलांना निश्चितच फायदा होईल. पुणे जिल्हा कर्करोगमुक्त आणि आरोग्यदायी भविष्याच्या दिशेने वाटचाल करेल,‌’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

kolhapur | जिल्ह्यातील सर्व मुलींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लस देणार
Police Action Pune: वीर येथे मद्यधुंद तरुणांचा धुडगूस; पोलिस प्रशासन आक्रमक

दिवाळीनंतर या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. ही कर्करोग प्रतिबंधक लस घेणे ऐच्छिक असणार असून, त्यापूर्वी पालकांची संमती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 9 ते 14 वर्षांतील सर्व मुलींना मार्च 2026 पर्यंत ही लस दिली जाणार आहे, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वयोगटातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या साधारणतः 35 हजार मुली आहेत. या सर्व मुलींना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news