जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग कसा घ्याल?

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग कसा घ्याल?
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फ्रान्स (ल्योन) येथे पुढील वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पधेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. फ्रान्स (ल्योन) येथे 52 क्षेत्रांशी संबंधित जागतिक कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

कौशल्य स्पर्धेचे जिल्हा, विभाग, राज्य तसेच देश पातळीवर आयोजन करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून अ‍ॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री डिझाइन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फर्मेशन नेटवर्क गॅबलिंग, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन आणि जल तंत्रज्ञान या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा तर इतर क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

कौशल्य स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून, निवड होणार्‍या उमेदवारांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम, हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तंत्रज्ञान संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीईटी, खासगी कौशल्य विद्यापीठ, फाइन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिटयूट, इन्स्टिटयूट ऑफ ज्वेलरी मेकिंग.

संपर्क करण्याचे आवाहन

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर 20 डिसेंबरपूर्वी नाव नोंदणी करावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र रास्तापेठ, पुणे या कार्यालयास भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्र. 020-26133606/भ्रमणध्वनी क्र. 8055992900 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news