दीड लाख कोटींची गुंतवणूक गुजरातमध्ये कशी पळाली? : डॉ. नीलम गोर्‍हे

दीड लाख कोटींची गुंतवणूक गुजरातमध्ये कशी पळाली? : डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासगी कंपन्यांच्या एकत्रित उपक्रमातून सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक, सेमीकंडक्टर उद्योगासारख्या मूलभूत क्षेत्रात होत आहे. ही गुंतवणूक भारतात प्रथमच या क्षेत्रात होईल आणि हजारो रोजगार निर्माण करण्याची क्षमता या गुंतवणुकीमुळे होणार आहे. मात्र ही दीड लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्र ऐवजी आता गुजरातमध्ये होणार आहे, ही गुंतवणूक कशी तिकडे पळाली असा सवाल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केला आहे. गोर्‍हे म्हणाल्या, राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जून महिन्यामध्ये या गुंतवणुकीविषयी प्राथमिक बोलणी उद्योगसमूहाशी केली होती. ही गुुंतवणूक महाराष्ट्रात येणार हे नक्की होते.

दीड लाख कोटींची दहा वर्षांची गुंतवणूक, त्यातून निर्माण होणारे हजारो रोजगार आणि उद्योगाला चालना मिळेल अशा पायाभूत सुविधांचा विकास हे सगळे महाराष्ट्रातून पळवून गुजरातमध्येे नेले आहे. असे उद्योग आपल्याकडून दुसर्‍या राज्यात जात असतील तर याला जबाबदार कोण, असा देखील त् यांनी प्रश्न उपस्थित केला.

पम्पिंग स्टेशन उभारून अंडरग्राउंड टँक तयार करावेत
पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. शहरभरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यात महापालिकेचे शून्य नियोजन पाहायला मिळाले. शहरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. सोबतच छोटे-मोठे नालेही भरून वाहू लागले. त्यामुळे पाणी साठत असलेल्या ठिकाणी पंपिंग स्टेशन्स उभारून अंडरग्राऊंड टँक तयार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news