पदपथावर होर्डिंगला पालिकेचीच परवानगी; मार्केट यार्डातील प्रकार

पदपथावर होर्डिंगला पालिकेचीच परवानगी; मार्केट यार्डातील प्रकार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मार्केट यार्डमधील रहदारीच्या शिवनेरी रस्त्यावर महापालिकेने चक्क फुटपाथवरच होर्डिंगला परवानगी दिल्याचे समोर आले आहे. मार्केट यार्डात खरेदी-विक्रीसाठी अवजड वाहनांसह दररोज सुमारे 20 ते 25 हजार नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे या भागात होर्डिंगमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांना जीव गमावावा लागल्यानंतर राज्यभरात होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला. पुणे महापालिकेने तर नियम डावलून होर्डिंगला परवानगी देण्याचा सपाटा लावत नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा कारभार सुरू केला आहे.

महापालिकेच्या दारातही होर्डिंगला नियमबाह्य परवानगी दिल्याचे समोर आले होते. आता मार्केट यार्डात पदपथावर होर्डिंग लागले आहे. राज्य सरकारने आकाशचिन्ह विभागासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पदपथावर आणि सार्वजनिक रस्त्यावर कोणताही जाहिरात फलक लावता येणार नाही. जेथे पदपथ नसेल तेथेही सार्वजनिक रस्त्यावर जाहिरात फलक लावता येणार नाही, अशी तरतूद केली आहे. मात्र, या नियमाचे उल्लंघन केले आहे.

महापालिकेची यंत्रणा वापरूनच मिळकतींचे सर्वेक्षण करा

महापालिकेची यंत्रणा वापरून केलेल्या सर्वेक्षणातून मिळकत करासंदर्भातील वस्तुस्थिती समोर येते, हे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केलेल्या प्रायोगिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मिळकतींचे सर्वेक्षण महापालिकेची यंत्रणा वापरूनच झाले पाहिजे. यामुळे नागरिकांना पी टी 3 फॉर्म भरण्याची वेळ येणार नाही, अशी मागणी आपले पुणे संस्थेचे संस्थेचे उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांनी केली आहे. मिळकतींचे 'जीआयएस' सर्वेक्षण खासगी संस्थेने चुकीच्या पद्धतीने केले आहे. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचा हकनाक त्रास मिळकतदाराला भोगावा लागत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news