या होर्डिंगसाठी महापालिकेने येथील चिंचेच्या झाडाच्या फांद्या छाटण्यास परवानगी दिली असून, प्रत्यक्षात मोठ्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. या ठिकाणी होर्डिंग उभारण्यात येणार असल्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. आता या ठिकाणी 400 चौरस फुटांचे होर्डिंग लावण्यात येणार आहे. यासाठी भर रस्त्यामध्ये भला मोठा गर्डर उभारण्यात आला आहे. बसस्थानकाशेजारीच महापलिका प्रशासनाने कोणताही विचार न करता रस्त्यावर होर्डिंग उभारण्याचे काम सुरू केले आहे. महापालिका आयुक्तांनी, झाड तोडून होर्डिंग उभारले असल्यास असे होर्डिंग काढून टाका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.