पुणे: कमला नेहरू रुग्णालयात एचएमआयएस सिस्टिम कार्यान्वित, ससून मात्र वंचित

पुणे: कमला नेहरू रुग्णालयात एचएमआयएस सिस्टिम कार्यान्वित, ससून मात्र वंचित
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या आरोग्य विभागाने कमला नेहरू रुग्णालयात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णसेवा तंत्रस्नेही करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. कमला नेहरू रुग्णालयात एक महिन्यापासून पुण्यातील स्मार्ट सिटीद्वारे विकसित करण्यात आलेल्या एचएमआयएस सिस्टिम वापरायला सुरुवात केली आहे. लवकरच महापालिकेची प्रसूती केंद्रे आणि इतर रुग्णालयांमध्ये यंत्रणा विस्तारित केली जाईल.

राज्य शासनातर्फे बंद करण्यात आलेली राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांमधील एचएमआयएस प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही किंवा त्याला पर्याय म्हणून नवीन यंत्रणाही विकसित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ससून रुग्णालयात अजूनही रुग्णांच्या उपचारांचे रेकॉर्ड ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एचएमआयएस सिस्टिम विकसित झाल्याने रुग्णांचा डेटा ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यास मदत होणार आहे.

कमला नेहरू जनरल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरज वाणी म्हणाले, "दररोज ओपीडीतील रुग्णांसाठी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. एचएमआयएस सिस्टिम गेल्या एक महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. आम्ही दररोज सुमारे 500 ओपीडी रुग्ण पाहतो आणि त्यामुळे आम्ही आता सिस्टिम अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत आहोत. शहरातील आमच्या प्रसूती केंद्र आणि सर्व दवाखान्यांमधील रुग्णांचा डेटा लवकरच एकत्रित केला जाणार आहे. रुग्णांची माहिती एकाच यूआयडी क्रमांकाद्वारे मिळू शकेल. भविष्यात बारकोड प्रणाली देखील सुरू केली जाईल. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि निदान, उपचार एकाच स्कॅनमध्ये उपलब्ध होऊ शकेल."

आरोग्य विभागच त्यावर निर्णय घेऊ शकतो

कमला नेहरू रुग्णालयात डिजिटलायझेशन सुरू होत असताना ससून रुग्णालयात मात्र सिस्टिमचा अभाव पाहायला मिळत आहे. जुलै 2022 मध्ये अचानक बंद झालेल्या एचएमआयएस प्रणालीस अद्याप कोणताही पर्याय उपलब्ध झालेला नाही. पूर्वीच्या एचएमआयएसला पर्यायी प्रणाली सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत. राज्यातील वैद्यकीय रुग्णालये आणि राज्याचा आरोग्य विभागच त्यावर निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

पूर्वीची प्रक्रिया खूप सोपी होती…

रुग्णांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्वी खूपच सोपी होती. फक्त फोन नंबर सांगून किंवा नाव सांगून तपशील समोर येत होता. माहिती देण्यासाठी जास्त वेळ रांगेत थांबण्याची गरज नव्हती. डॉक्टरही कॉम्प्युटरवर रुग्णांचा इतिहास सहज तपासू शकतात. आता प्रत्येक वेळी फाईल तपासून रुग्णांचा वैद्यकीय इतिहास तपासावा लागत आहे. कोणतेही कागदपत्र किंवा चाचणी अहवाल गमाविल्यास पुन्हा चाचण्या कराव्या लागतील, अशी माहिती ससूनमधील डॉक्टरांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news