पुणे : ग्रीन बिल्डिंगमध्ये सापडेना हिरकणी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची होतेय गैरसोय

पुणे : ग्रीन बिल्डिंगमध्ये सापडेना हिरकणी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची होतेय गैरसोय
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील पहिली हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची नोंद आहे. या इमारतीमध्ये महिलांसाठी आवश्यक असलेला हिरकणी कक्ष सापडत नसल्याचा प्रकार नुकताच घडला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात हिरकणी कक्ष असण्यावरच प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरुवारी उच्च तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत 316 उमेदवारांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. त्यात काही महिलांचा समावेश होता. एक महिला आपल्या पाच ते सहा महिन्यांच्या बाळासह नियुक्तिपत्र घेण्यासाठी आली होती.

कार्यक्रम बराचवेळ सुरू असल्याने महिला सभागृहात होती, तर सोबत आलेली व्यक्ती बाळाला घेऊन बागेत बसली होती. या वेळी बाळ रडायला लागले. त्या बाळाला पाचव्या मजल्यावर असलेल्या महिलेजवळ दिले, परंतु बाळाचे रडणे थांबत नव्हते. बाळाला स्तनपान करण्यासाठी पाचव्या मजल्यावर महिलेने हिरकणी कक्षाचा शोध घेतला. मात्र, त्या ठिकाणी असा कक्ष नसल्याने महिलेसमोर प्रश्न निर्माण झाला. सभागृह आणि बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. प्रतीक्षागृहातही नागरिक बसलेले होते. त्यातच बाळ रडायला लागले. महिलेला नाईलाजाने प्रतीक्षागृहातच बाळाला स्तनपान करावे लागले.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष बंधनकारक आहे. हा कक्ष सर्वांना सहज सापडेल, अशा ठिकाणी असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची ही इमारत राज्यात ग्रीन बिल्डिंग म्हणून प्रसिद्ध आहे. कार्यालयात कार्यरत असलेल्या आणि कामानिमित्त येणार्‍या महिलांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना हिरकणी कक्ष का सुरू करण्यात आला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, सर्वसाधारण शाखेत हिरकणी कक्ष कुठे आहे, अशी विचारणा केली, त्यावर दुसर्‍या मजल्यावर असून, त्याचा कोणी वापरत करत नाही, आत्तापर्यंत एकाच महिला कर्मचारी यांनी चौकशी केली आहे, असे सांगण्यात आले. वास्तवात हा कक्ष सर्वांना सहज सापडेल, अशा ठिकाणी असणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news