कुणबी दाखल्यासाठी हिरडस मावळ एकवटला

कुणबी दाखल्यासाठी हिरडस मावळ एकवटला

भोर : पुढारी वृत्तसेवा : 12 मे 2001 साली भोर पंचायत समितीला लागलेल्या आगीत जुनी कागदपत्रे (रेकॉर्ड) जळाल्याने हिरडस मावळातील मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले काढण्यासाठीची लागणारी कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी मराठा समाज बांधव एकवटला असून, याबाबत निगुडघर येथे रविवारी (दि. 31) बैठक पार पडली. रेकॉर्ड जळाल्याने सरसकट मराठा बांधवांची कुणबी नोंद करण्यात आली पाहिजे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबतचे निवेदन भोर प्रशासन तसेच मुख्यमंत्री यांना देण्याचा निर्णय झाला आहे. तर पुढील आठवड्यात हिरडस मावळातील 36 गावांतून सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामार्फत कायदेशीर लढा लढणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

भोर तालुक्यातील जवळपास 91 गावांतील रेकॉर्ड जळीत असल्याची माहिती मिळाली आहे. यात हिर्डोशी खोर्‍यातील संपूर्ण गावांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील कुणबीच्या नोंदी सापडणे कठीण झाले आहे. तेव्हा या भागातील रेकॉर्ड जळाले आहे, यात आमचा काय दोष? असे म्हणत मावळातील प्रत्येक गावातील मराठा समाज एकत्र येत बैठकीत सहभाग झाला होता. सकल मराठा समाजाचे भोर तालुकाध्यक्ष संजय भेलके, सारंग शेटे, सोमनाथ ढवळे, सुनिल थोपटे, कुणाल धुमाळ, एकनाथ रोमण यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news