High blood pressure patients: सहा महिन्यांत उच्च रक्तदाबाचे 95 हजार रुग्ण; तपासणीतील निष्कर्ष

41 हजार जणांना मधुमेह
High Blood Pressure
सहा महिन्यांत उच्च रक्तदाबाचे 95 हजार रुग्ण; तपासणीतील निष्कर्षFile Photo
Published on
Updated on

पुणे: आरोग्य विभागाकडून संसर्गजन्य आजारांच्या उपाययोजनांप्रमाणेच असंसर्गजन्य आजारांची तपासणीही केली जात आहे. पुणे विभागात (पुणे, सोलापूर, सातारा) फेब्रुवारीपासून मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग अशा असंसर्गजन्य आजारांबाबत सर्वेक्षण केले जात आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत उच्च रक्तदाबासाठी 16 लाख 57 हजार 99 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 95 हजार नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे.

विषाणूजन्य, जलजन्य किंवा किटकजन्य आजार, क्षयरोग, एचआयव्ही इत्यादी संसर्गजन्य आजारांच्या तुलनेत असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण देशात झपाट्याने वाढत आहे. देशात होणा-या एकूण मृत्यूंपैकी 60 टक्के मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, कर्करोग, तीव्र श्वसन रोग, मधुमेह यामुळे होत असल्याचे शासकीय आकडे सांगतात. (Latest Pune News)

High Blood Pressure
Accident News: कुर्डूवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर अपघात; इंदापुरातील दोघांचा मृत्यू

संसर्गजन्य आजार नियंत्रित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कर्करोग यांचे प्रमाण आणि प्रादूर्भाव जाणून घेतला जात आहे. कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट लवकर निदान करणे आणि लवकर उपचार पोहोचवणे हे आहे. बहुतेक मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे होतात. हे प्रमाण 2030 पर्यंत 25 टक्क्यांनी कमी करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

High Blood Pressure
Bail Pola: गावोगावी बैलपोळ्याचा थाट हरवला; संस्कृतीचा सण केवळ औपचारिकतेपुरता उरला

मधुमेहाचे निदान

पुणे विभागात मधुमेहासाठी 14 लाख 6 हजार 421 जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी 41 हजार 496 जणांमध्ये मधुमेहाचे निदान झाले. पुणे विभागातील 5,79,490 तपासणी झालेल्या नागरिकांपैकी 16 हजार 547, सोलापूरमध्ये 3 लाख 54 हजार 816 पैकी 18 हजार 608 आणि सातारा जिल्ह्यातील 4 लाख 72 हजार 115 पैकी 6341 जणांमध्ये मधुमेहाचे निदान झाले.

असंसर्गजन्य आजार नियंत्रित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आदी आजारांची तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

- डॉ. नागनाथ यमपल्ले, उपसंचालक (प्रभारी), आरोग्य सेवा, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news