

पुणे: गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यात ढगाळ हवामान दिसून येत होते. आज अखेर पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात बदल होऊन थंडावा निर्माण झाला आहे.
संपूर्ण शहरामध्ये आज सकाळपासून गारवारे वाहत असून शहराला सर्व बाजूंनी ढगांनी वेढले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडलेली पाहायला मिळाली. अचानक पाऊस आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला थांबून आसरा घ्यावा लागला. (Latest Pune News)
तापमानात मोठी घट
राज्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कमाल तापमानात 8 ते 10 अंशांनी घट झाली आहे. दिवसभर गार वारे सुटल्याने नागरिकांची असह्य उकाड्यातून सूटका झाली.
या ठिकाणी ’यलो अलर्ट’ (कंसात तारीख)
पुणे (9 ते 12),धुळे (9), जळगाव (9 ते 12),अहिल्यानगर (9 ते 12), कोल्हापूर (9 ते 12), सातारा( 10 ते 12), छ. संभाजीनगर (9 ते 11), अकोला (10 ते 12), भंडारा (10 ते 12), बुलडाणा (11,12), चंद्रपूर (9 ते 12), गडचिरोली (9 ते 12), गोंदिया (10,11), नागपूर (9 ते 11), वर्धा 9 ते 11), वाशिम (11,12), यवतमाळ (11,12).
राज्यात 24 तासांत झालेला पाऊस (मी.मी मध्ये)
मुंबई (18.5), रायगड (13.5), लोणावळा (3.5), कर्जंत (2.5), पुणे (गिरीवन 2.5,लवासा 4,तळेगाव 3.5,माळीन 7.5), निमगिरी 10.5) नाशिक 18.