लोणावळ्यात वार्‍यासह मुसळधार पाऊस

लोणावळ्यात वार्‍यासह मुसळधार पाऊस
Published on
Updated on

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा : अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने लोणावळेकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वार्‍यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल त्या छपराचा आसरा घेतला.
लोणावळा शहर आणि परिसरात गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार वार्‍यासोबत पाऊस कोसळू लागला.

सुमारे अर्धा तास सलग बरसणार्‍या या पावसामुळे बाजारहाट किंवा अन्य कारणासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच कामावरून घरी परतणार्‍या कामगार वर्गाची चांगलीच फजिती झाली. रस्त्यावर बसलेल्या पथारीवाल्यांना तसेच हातगाडीवर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना आपल्या पथार्‍या, हातगाड्या जागेवर सोडून मिळेल त्या छपराच्या ओसरीला धाव घ्यावी लागली. शहरातील अनेक रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news