पुणे: सलग तिसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. शुक्रवार, शनिवारपाठोपाठ रविवारीही पाऊस मनसोक्त बरसला. त्यामुळे रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
चिंचवड परिसरात सर्वाधिक 33.5, तर लोहगाव येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली. अलर्ट जारी केल्याने शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शहरात 17 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. मात्र, मंगळवारपासून जोर कमी होत आहे. 18 सप्टेंबरनंतर पाऊस पूर्ण कमी होईल, असा अंदाज आहे. (Latest Pune News)
मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी
रविवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावत पुणेकरांची चांगलीच धांदल उडवली. रात्री उशिरापर्यंत अधून-मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. तर आज सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला असल्याने पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
स्थानिक शाळाने निर्णय घेऊन मुलांना सुट्टी दिली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहे तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हडपसर परिसरात बहुतेक शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
शहर,परिसर आणि जिल्ह्यात अतिवृष्टी
गत बारा तासात सम्पूर्ण शहर परिसर आणि जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परतीचा मान्सून राजस्थान मधून रविवारी निघाल्यामुळे तो महाराष्ट्रात वेगाने येत आहे त्याचा परिणाम रविवारी उत्तररात्री आणि सोमवारचा दिवस उजडताच दिसला.
रविवारी दिवसभर मध्यम पाऊस झाला मात्र उत्तररात्री पावसाचा जोर वाढला त्यामुळे बारा तासात जिल्हा, शहर आणि परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे हवेली भागात सर्वधिक 180 मी मी ची नोंद झाली आहे.तर शिवाजीनगर भागांत 60 मी मी पावसाची नोंद झाली. शहरावर बारा रसापासून जलधारा सुरूच आहेत त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात झालेला पाऊस... (रविवार रात्री 10 ते सोमवारी सकाळी 10 पर्यंत)
हवेली 180.
दौंड 85.5
चिंचवड 82.5
शिवाजीनगर 60
पाषाण 60
डुडुळगाव 57
हडपसर 56
बारामती 52.
मगरपट्टा 48
लवळे 50
तळेगाव 28
राजगुरुनगर 12
दापोडी 10