

पुणे: गुरुवारी रात्री शहरातसह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली. रात्रभर संथगतीने पाऊस पडत होता, तो सकाळी नऊच्या सुमारास कमी झाला सर्वाधिक पाऊस भोर येथे 49 मिलिमीटर झाला.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आगामी तीन दिवस कोकणसह मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. त्याची सुरुवात गुरुवारी दुपारपासूनच झाली हवामान विभागाने दिलेले अलर्ट मंत्रालयानेही तत्परतेने पाठवले. सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाला गुरुवारी दुपारी सुरुवात झाली. (Latest Pune News)
संध्याकाळी सुरू झालेल्या पाऊस थोड्या वेळाने थांबला मात्र रात्री नऊ नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पुणे शहरात रात्रभर पाऊस संथगतीने पडत होता. शहरासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जणू मान्सून बरसत असल्याचा अनुभव या पावसाने दिला. दरम्यान आज आणि उद्या देखील संपूर्ण जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सावधानतेचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे.
गत बारा तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस...(मी मी.)
भोर ४९
गिरिवन २८
बारामती २१.५
एनडीए १७.५
तळेगाव धमढेरे १४
पाषाण १३.५
चिंचवड १२.०
हवेली ११.५
शिवजीनगर १०.५
हडपसर १०
वडगावशेरी १०
लावासा ८
कोरेगाव पार्क ७.५
टेलेगाव ७
बल्लाळवाडी ६.५
राजगुरुनगर ६
नारायणगाव ६
दुदुलगाव ५
निमगिरी ५
मॅगारपाटा ३
लोणावळा ३
पुरंदर ०.५
मालिन ०.५
दापोडी ०.५