

Monsoon Alert
पुणे : राज्यातील मुंबईसह आसपासच्या भागात अनेक दिवस रखडलेला पाऊस आता मात्र सक्रीय झाला असून, येत्या 48 तासात विदर्भ व्यापणार आहे. दरम्यान पुढील काही दिवस कोकणात अतिमुसळधार (रेड अलर्ट), मध्यमहाराष्ट्रात (ऑरेज अलर्ट) मुसळधार, मराठवाडा आणि विदर्भात (यलो अलर्ट ) वादळीवारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. विशेषत: कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पोषक स्थिती अभावी थबलेला मान्सून आता मात्र पुढे सरकू लागला आहे. येत्या 48 तासात हा मान्सून विदर्भ व्यापणार आहे. त्याचबरोबर मध्य आणि पश्चिम भारताच्या भागाकडे आगेकूच करून व्यापणार आहे. दरम्यान दक्षिण पूर्व मध्य प्रदेश ते हरियाणापर्यत द्रोणीय स्थिती आहे. तसेच आंध्रप्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीपासून दक्षिण ओडिसा पर्यत चक्रीय स्थिती कायम आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीपासून मराठवाडा पार करून छत्तीसडपर्यत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या सर्व स्थिती मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल आहेत. त्यामुळेच मुंबईसह राज्याच्या काही भागात थबलेला मान्सून आता सक्रीय झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसामध्ये कोकणात अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तर मध्यमहाराष्ट्रातील पुणे घाट माथा, नाशिक घाट माथा, कोल्हापूर , कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता आहे. दरम्यान पावसाळी स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेला कमाल तापमानाचा पारा आता मात्र कमी झाला आहे. राज्यात गुरूवारी अमरावती शहराचे जिल्ह्याचे कमाल तापमान 39.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
- रेड अलर्ट : -रायगड (14), सिंधुदुर्ग (15)
आँरेज अलर्ट :- मुंबई (14), ठाणे (14), रायगड (13,15,16), सिंधुदुर्ग ( 13,14,16), कोल्हापूर घाटमाथा ( 13,16), कोल्हापूर (13), सातारा घाटमाथा(3,16), सांगली (13), अकोला (13,14,15), अमरावती ( 13), चंद्रपूर (13,14,15), गडचिरोली ( 13,14,15), गोंदिया (13,14), नागपूर 13,14)
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, छ.संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा,वर्धा, वाशिम, यवतमाळ