Weather Forecast | राज्यात आजपासून मुसळधारेचा अंदाज

कोकणात ७ व ८ जुलै रोजी अतिवृष्टी
Maharashtra Rain Update
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार File Photo

पुणे : राज्यात हवेचे दाब अनुकूलझाल्याने शुक्रवारपासून (५ जुलै) मान्सून जोर धरणार आहे. ५ ते १० जुलैदरम्यान संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार, तर कोकणात ७ व ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Summary
  • मान्सूनने संपूर्ण भारताचा मैदानी प्रदेश व्यापला आहे.

  • ६ दिवस आधीच नैऋत्य मान्सून वारे संपूर्ण देशात पोहचले आहे.

  • मान्सून सक्रिय झाला आहे.

  • दरम्यान काही राज्यांत अतिवृष्टी ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

केरळ-महाराष्ट्र किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा

देशाच्या कानाकोपऱ्यात मान्सून २ जुलै रोजी पोहोचल्याने तो लवकरच हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होत आहे. त्यामुळे पावसाचा जोर देशभर वाढणार आहे. महाराष्ट्रातही हवेचे दाब ९४२ ते १००२ हेक्टा पास्कल इतके अनुकूल झाल्याने राज्यात मान्सूनच्या वाऱ्यांनी जोर धरला आहे. दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा किनारपट्टीवर तयार झाल्याने केरळ ते महाराष्ट्र किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news