पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरासह मंगळवारी दुपारनंतर अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरात चांगलीच दाणादाण उडवून विशेषत: वडगाव शेरी, धानोरी, लोहगाव भागात पावसामुळे रस्त्यावर जोरदार पाणी वाहिले. काही भागात तर रस्त्यावरच पाण्याची तळी साठली. त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातच वाहने अडकून पडली. या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्तेदेखील जलमय झाले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसरात अजून दोन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
दरम्यान, मंगळवारी वडगाव शेरी भागात 114.5 मिमी पाऊस पडला. शहरातील सर्वात अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. दरम्यान अजून दोन दिवस शहरात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बिबवेवाडी, सहकारनगर,चिंतामणीनगर, कर्वेरोड भागात 15 ते 20 ठिकाणी झाडपडी तसेच झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना काही झाडांच्या फांद्या वाहनांवर पडल्यामुळे वाहनांचे नुकसान शहरात मंगळवारी दुपारनंतर धुव्वाधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर एवढा मोठा होता की, काही वेळातच शहरासह उपनगरातील रस्ते जलमय झाले. काही रस्त्यांना तर ओढ्या नाल्याचे स्वरूप आले होते.
शहरातील येरवडा, वडगाव शेरी, चंदननगर, पर्वती, शिवाजीनगर, धनकवदी, आंबेगाव पद्मावती, कोंढवा, तसेच शहराचा मध्यवर्ती भाग यासह सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कित्येक भागात भूमिगत वाहिन्यांबरोबर ओव्हरहेड वाहिन्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी, सहकारनगर, चिंतामणीनगर, कर्वेरोड या भागात 15 ते 20 ठिकाणी झाडपडी तसेच झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वाहनांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहनाचेदेखील नुकसान झाले आहे.
हेही वाचा