Lok sabha Election 2024 Results : पंकजा मुंडे यांचा पराभव, बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी | पुढारी

Lok sabha Election 2024 Results : पंकजा मुंडे यांचा पराभव, बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी

बीड, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला आहे. बीड जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा हा वाद पेटल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला होता. त्यामुळे बीडची लढत अटीतटीची ठरली. पहिल्या काही फेर्‍यांमध्ये आघाडीवर असणार्‍या सोनवणे यांना नंतर मुंडे यांनी रोखून ठेवले. पण 32 व्या फेरीनंतर सोनवणे हे आघाडीवर राहिले आणि त्यांनी अटीतटीच्या लढतीत विजय खेचून आणला.

Back to top button