

पुणे: सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीमधील उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांनी दाखल केलेल्या महत्त्वाच्या तक्रार अर्जावर मंगळवारी 24 जून रोजी एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धर्मादाय न्यायालयाच्या फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सुरू असून उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांच्या याचिकेवर युक्तिवाद होणार आहे. संस्था ही कुटुंब संस्था होऊ नये यासाठी प्रविणकुमार राऊत आणि मिश्रा यांनी आक्षेप घेतले होते.(Latest Pune News)
त्याची सुनावणी याआधी झाली. आता प्रकरण निकालाच्या दिशेने जवळ आल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यात आत्मानंद मिश्रा हे पूर्ण ताकदीने संस्था वाचवण्यासाठी सज्ज झाले असून, अॅड.मयुरा काळे आणि अॅड. रोहन घोलप यांनी मिश्रा यांचे वकील पत्र स्वीकारले आहे. संस्था वाचवण्यासाठी उपाध्यक्ष स्वतः पैसे खर्च करीत आहेत.
संचालक मंडळ मात्र एकत्र आले...
मिलिंद देशमुख आणि अध्यक्ष दामोदर साहू हे आपल्या मुलांसह प्रेमकुमार द्विवेदी यांच्या नातवाला संस्थेवर घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र संस्था कुटुंब संस्था होऊ नये, यासाठी संचालक मंडळ एकत्र आले आहे. कोरम पूर्ण नसताना घेतलेला ठराव बेकायदेशीर असल्याचे धर्मादाय न्यायालयाच्या निदर्शनास मिश्रा यांच्या वकील अॅड. मयुराकाळे यांनी आणल्याने 24 जून रोजी त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
घटना आणि घडामोडी
अध्यक्ष दामोदर साहू यांनी 11 एप्रिल 2025 रोजी देशमुखची सचिवदावरून हकालपट्टी केली. त्याबद्दल धर्मादाय न्यायालयात बदल अर्ज सादर करणे अनिवार्य होते. मात्र अध्यक्ष साहू यांनी अर्ज दाखल केला नाही. त्याबद्दल प्रश्न उपस्थित करत धर्मदाय न्यायालयात एकाचवेळी वेगवेगळी सहा प्रकरणे सुरू झाल्याने संस्थेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
धर्मादाय न्यायालयाचे निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याची तयारी देशमुखने केली. त्यासाठी संचालक मंडळाकडे प्रस्ताव ठेवला मात्र उपाध्यक्ष मिश्रा यांनी स्वाक्षरी करण्यास नकार