पारगाव : बराकींसमोर लागले सडलेल्या कांद्यांचे ढीग

पारगाव : बराकींसमोर लागले सडलेल्या कांद्यांचे ढीग

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असताना बराकींबाहेर मात्र सडलेल्या कांद्यांचा ढीग पाहायला मिळत आहे. बाजारभाववाढीचा फायदा शेतकर्‍यांना होत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून कांद्यांच्या बाजारभावात वाढ झाली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कांदे बाजारपेठांमध्ये पाठविण्याची लगबग सुरू आहे.

कांद्यांना 10 किलोला 300 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे, परंतु अतिपावसाचा फटका कांद्याला बसला. त्यामुळे बराकीतील कांदे सडले. आता प्रतवारी करताना सडलेल्या कांद्यांचेच प्रमाण अधिक आहे. बराकीतील निम्म्याहून अधिक कांदे फेकून द्यावे लागत आहेत. त्यामुळे या भागात अनेक शेतकर्‍यांच्या बराकींसमोर सडलेल्या कांद्यांचे ढीग पाहायला मिळत आहेत. बाजारभाववाढीचा फायदा शेतकर्‍यांना होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

कांदा पिकासाठी शेतकर्‍यांनी मोठे भांडवल गुंतवले आहे, परंतु सततच्या अतिपावसाचा फटका बराकीत साठवलेल्या कांद्यांना बसला. त्यामुळे कांदे मोठ्या प्रमाणात सडले. गुंतवलेले भांडवल वसूल होणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news