देहूगाव बाजारपेठमध्ये कचर्‍याचे ढीग

देहूगाव बाजारपेठमध्ये कचर्‍याचे ढीग
Published on
Updated on

देहूगाव : देहुगाव मध्ये देहू आळंदी रोडलगत एक खाजगी देहुगाव पाजारपेठ (भाजी मंडई) आहे. या खाजगी भाजी मंडई मध्ये आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो.या भाजी मंडईत ,चाकण , व देहुगाव परिसरातुन अनेक भाजी विक्रते येतात. दोन दिवस भरणार्‍या या भाजी मंडईत अनेक लोक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात.या भाजी मंङईंत वाहन तळाची व्यवस्था असली तरी ती अपुरी पड़त असल्याने ,अनेकजन आपली वाहने रस्त्याच्या दुतरफा लावतात.

परिणामी सायंकाळी तीन ते चार तास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.शेवटी वाहन चालकांची एकमेकांशी बाचा बाच होवून त्याचे पर्यावसन हणामारीत होत आहे.ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. या विषयी स्थानिक नगरपंचायत प्रशासनने त्वरित लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी या भागात राहणारे रहीवासी तसेच नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करणारे वाहन चालक करु लागले आहेत

भाजीपाल्याचा कचरा रस्त्यावर
बाजार संपल्या नतंर उरलेला भाजीपाला आणि कचरा काही व्यापारी रस्त्याच्या कड़ेला टाकतात.तो कचरा वेळेत उचलला न गेल्याने रणरणत्या उन्हामुळे त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरून आजु बाजूला राहणार्‍या लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तर हाच कचरा गटारात जात असून गटार तुंबल्याचे प्रकार घडत आहेत .संबधीत खाजगी भाजी मंडई चालक या प्रश्नाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे.त्याचा तान देहुगाव नगर पंचायतीवर येत आहे.त्यामुळे या खाजगी भाजी मंडईमुळे जी वाहतूक कोंडी होत आहे,कचर्‍याचा त्रास आजु बाजूला राहणार्‍या रहवासीयांना होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news