

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणाचा उजवा कालवा शहरामधून जातो. या कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. लष्कर भागात कालव्यामध्ये कचरा साचला असून, या कचर्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
लष्कर भागातील महात्मा गांधी बसस्थानक, सोलापूर बाजार परिसर आणि डेक्कन टॉवरच्या मागे जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कालव्यात कचरा साचलेला आहे. विशेष म्हणजे या परिसरात दोन शाळा असून, त्यात सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
अनेक दिवसांपासून कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला. घाणीमुळे डास वाढले आहेत. या कचर्याकडे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, आरोग्य आणि जलसंपदा विभाग दुर्लक्ष करत आहे. याठिकाणचा कचरा उचलावा, अशी मागणी मनसे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभाग अध्यक्ष शिरीष आगुरेड्डी यांनी केली आहे.