Pimpari : फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन; विक्रेत्यांना देणार हक्काची जागा

Pimpari : फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन; विक्रेत्यांना देणार हक्काची जागा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरात फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करून विक्रेत्यांना हक्काची जागा दिली जाणार आहे. त्या जागेच्या आकारानुसार महापालिकेकडून दररोज 20 ते 150 रुपये आणि दरमहा 750 रूपये ते 3 हजार 750 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शुल्क न भरता व्यवसाय करताना आढळल्यास 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे. प्रसंगी परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. हे दर पाच वर्षे कायम राहणार आहेत. महापालिकेच्या वतीने सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयातील निश्चित केलेल्या मोकळ्या जागेत हॉकर्स झोन तयार करण्यात येत आहे. फेरीवाला धोरणानुसार फेरीवाला (पथविक्रेता) समितीची बैठक 20 ऑक्टोबर 2023 ला झाली.

त्या बैठकीत हॉकर्स झोनच्या जागा व पथविक्रेत्यांसाठी आकारणी करायवाचे नोंदणीशुल्क, जागा भाडे व दंड आदीबाबत प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या दरांमध्ये 25 टक्के सवलत देऊन मान्यता देण्यात आली आहे. हे दर पाच वर्षांसाठी लागू राहणार आहेत.
दैनिक व मासिक शुल्क 15 दिवस न दिल्यास देय रकमेवर 5 टक्के दंड लावण्यात येणार आहे. तीन महिने देय रक्कम न भरल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. शुल्क थकीत असताना व्यवसाय करताना आढळल्यास 1 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. एका आर्थिक वर्षांत 5 वेळा दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरही शुल्क थकीत असतानाही व्यवसाय केल्यास परवाना रद्द केला जाणार आहे. हे जागेचे दर शुल्क व दंडाचे शुल्काच्या दरास महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीत मान्यता दिली आहे.

विविध कारणांसाठी दीड हजारापर्यंत शुल्क
नोंदणी शुल्क 1 हजार रुपये आहे. प्रमाणपत्र शुल्क 200 रुपये आहे. ओळखपत्र शुल्क 200 रुपये आहे. दुबार ओळखपत्र किंवा प्रमाणपत्रासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नोंदणी, प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी एकदाच शुल्क द्यावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news