दापोडी : रस्त्यावरील हातगाड्यांमुळे अपघाताला निमंत्रण

दापोडी : रस्त्यावरील हातगाड्यांमुळे अपघाताला निमंत्रण

दापोडी : परिसरातील विविध रस्त्यांवर फळांसह, कपडे व विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे प्रमाण वाढले आहेत. रस्त्यावरील या अनधिकृत विक्रीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच, यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावर फळ व कापड विक्री वाढली आहे. रेकॉर्डिंग केलेले स्पीकरवर मोठ्या आवाजात लावून वस्तूंच्या विक्रीचा गाडा रस्त्याच्याकडेला उभा केला जात आहे. बाजार भावापेक्षा कमी दरात विक्री होत असल्याचा दावा केला जात असल्याने अनेक जण या ठिकाणी थांबतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते.

वाहतूक कोंडीत भर
जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी परिसरातील रस्ता रुंदीचा फायदा हातगाडी व टेम्पोवर माल विकणारे दिसत आहेत. रस्ता मोठा असल्याने व जास्त विक्रेते येत असल्याने व त्यांच्यातील स्पर्धेमुळे अनेक विक्रेते अर्ध्या रस्त्यावरच हातगाडी येऊन वस्तूंची वाजवी किंमत सांगून आवाज देतात. याचा वाहनचालकांना गाडी चालविताना त्रास होत असल्याचा विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारचे भान राहत नाही. ते आपला माल विक्रीत मग्न असतात. मात्र, अशावेळी अपघात झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

स्पीकरवरील कर्णकर्कश आवाज परिसरात राहणार्‍या नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. या आवाजाने हॉर्नचाही आवाज ऐकायला येत नाही. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करावी. पोलिसांसह महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी.
                                                                          – दीपाली कणसे, दापोडी

मालाची विक्री करण्यासाठी रस्त्याच्यामध्येच येऊन आणि मोठ्याने ओरडून माल विकणे हे विक्रेत्यांच्या व वाहनचालकांच्या दृष्टीने धोक्याचे आहे. वाहनचालकांना याचा मोठा त्रास होतो. यामुळे अपघात घडण्याची शक्यता अधिक आहे.
                                                           -नीलेश फुगे, फुगेवाडी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news