पुणे : सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

पुणे : सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड रस्त्यावरील दुकानांच्या समोर व साइड मार्जिनमध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत 14 दुकांनाचे नामफल काढले तर तीन हजार चौरस फुट जागा मोकळी करण्यात आली.
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतंर्गत अतिक्रमण कारवाई हाती घेण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग आणि आकाश चिन्ह विभागाने मंगळवारी सिंहगड रस्ता परिसरात संयुक्त कारवाई केली.

या कारवाईमध्ये 14 नामफलक काढून टाकण्यात आले. तसेच फ्रंट  व साईड मार्जिनमध्ये करण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करून 3 हजार चौरस फुट क्षेत्रफळ मोकळे केले. ही कारवाई उपआयुक्त परिमंडळ तीनचे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाचे 50 अधिकारी कर्मचारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील यादव, आकाश चिन्ह निरीक्षक युवराज वाघ, अजित जोगळेकर यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news