

पुणे / हडपसर : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 मधील इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज बुधवारी (दि. 31 डिसेंबर) होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मारकड यांनी दिली.
या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 15, 16 आणि 17 प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले असून, त्यांच्या अर्जांची छाननी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
या अर्जांची छाननी होत असताना प्रथम प्रभाग क्रमांक 15 मधील अ, ब, क आणि ड प्रवर्गातील अर्जांची छाननी होणार असून, त्याप्रमाणेच प्रभाग १६ आणि १७ मधील उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे.